PM Modi watch price : मोदींच्या मनगटावर चमकतंय 'हे' स्वदेशी घड्याळ; किंमत आणि ब्रँड ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

Rashmi Mane

स्वदेशी घड्याळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच त्यांच्या साधेपणा आणि स्वदेशी विचारांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांच्या मनगटावर झळकणारे एक खास देसी घड्याळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

विदेशी नाही, तर भारतीय ब्रँड

हे घड्याळ कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडचं नसून, जयपूर वॉच कंपनी या भारतीय स्टार्टअपचं आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देणारा हा क्षण ठरत आहे.

संस्थापक गौरव मेहता यांची भावना

जयपूर वॉच कंपनीचे संस्थापक गौरव मेहता यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांचं घड्याळ घालणं हा क्षण अत्यंत भावुक करणारा होता. ही कोणतीही भेटवस्तू किंवा जाहिरात नव्हती, तर मोदींची वैयक्तिक पसंती होती.

8 महिन्यांपासून वापरात

गेल्या सुमारे 8 महिन्यांपासून पंतप्रधान मोदी हे जयपूर वॉच कंपनीचं घड्याळ वापरत आहेत. या घड्याळावर सिंहाचं प्रतीक असून ते आत्मविश्वास आणि भारतीय परंपरेचं दर्शन घडवतं.

किंमत आणि दर्जा

या खास घड्याळाची किंमत साधारणपणे 55,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान आहे. दर्जा, डिझाइन आणि भारतीयत्व याचं सुंदर मिश्रण यात पाहायला मिळतं.

खास डिझाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डायलमध्ये 1947 सालचे एक दुर्मिळ एक रुपयाचे नाणे जडवलेले आहे.

Next : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा विरोधकांना पहिला टोला अन् कार्यकर्त्यांना खास संदेश...

येथे क्लिक करा