Modi masterstrokes : 'सर्जिकल स्ट्राइकपासून 370 रद्दपर्यंत'; मोदींच्या नेतृत्वातील 10 मास्टरस्ट्रोक

Rashmi Mane

मोदी सरकारचे 10 मास्टरस्ट्रोक

दहा वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी काही धडाकेबाज आणि धाडसी निर्णय घेतले, ज्यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रवाहाला नव्याने दिशा दिली.

Narendra Modi | sarkarnama

नोटाबंदीची घोषणा

काळा पैसा आणि बनावट नोटांविरोधात लढण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.

Sarkarnama

स्वच्छ भारत अभियान

2 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियान देशभरात स्वच्छता आणि उघड्यावर शौचमुक्त गावे निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. भारताला स्वच्छ, निरोगी आणि कचरामुक्त करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली.

Sarkarnama

वस्तू व सेवा कर (GST)

एक देश, एक कर! 1 जुलै 2017 रोजी जीएसटी अंमलात आला. गुंतागुंतीचे कर हटवून देशात एकसंध कर व्यवस्था आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.

Sarkarnama

तिहेरी तलाक बंदी

मुस्लिम महिलांना दिलासा! 2019 मध्ये तिहेरी तलाकला कायदेशीर बंदी घालण्यात आली. या बंदीमुळे सामाजिक सुधारणा घडवणारे हे एक महत्त्वाचे पाऊल उचण्यात आले.

Sarkarnama

कलम 370 रद्द

जम्मू-कश्मीरला नवी ओळख! 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा हटवून पूर्णतः भारतात विलीन करण्यात आले.

Sarkarnama

सीमापार कारवाई

उरी हल्ल्यानंतर भारताने सीमापार सर्जिकल स्ट्राइक करत आपली लष्करी ताकद दाखवली!

Sarkarnama

सीमापार कारवाई

2019ला पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइक करण्यात आले.

Sarkarnama

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)

शेजारी देशांतील पीडितांना आश्रय! 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्वाची संधी मिळाली.

Sarkarnama

100% FDI दूरसंचार क्षेत्रात

FDI दुरसंचार क्षेत्रात 100% मुक्त केल्यामुळे डिजिटल भारताला बूस्ट मिळाला आहे. दूरसंचार क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मोकळीक मिळाली. नवे तंत्रज्ञान, नवी स्पर्धा आणि वेगवान विकास साध्य होऊ शकले.

Sarkarnama

ऑपरेशन सिंदूर

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवून उत्तर दिलं.

Next : 75व्या वर्षीही ऊर्जा तशीच! PM मोदींच्या हेल्दी लाइफस्टाइलचं गुपित काय?

येथे क्लिक करा