Narendra Patil : नरेंद्र पाटील यांनी वाढविले उदयनराजेंचे टेन्शन

Vijaykumar Dudhale

भाजप इच्छुकांचे मतदारसंघात दौरे

महायुतीमध्ये सातारा लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांकडून दावे करण्यात येत आहेत. त्यातही भाजपच्या इच्छुकांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.

Narendra Patil | Sarkarnama

अजित पवारांंच्या राष्ट्रवादीचाही दावा

ज्या पक्षाचा खासदार त्या पक्षाला तो मतदारसंघ असे सांगत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सातारा लोकसभेवर दावा सांगितला आहे.

Narendra Patil | Sarkarnama

उदयनराजेंचा उमेदवारीसाठी दिल्ली दौरा

भाजपकडून उदयनराजे भोसले हेही इच्छुक आहेत. उदयनराजे यांनी दिल्लीत तीन दिवस ठाण मांडून पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीचा शब्द आणल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

Narendra Patil | Sarkarnama

फडणवीसांच्या भेटीनंतर नरेंद्र पाटील सक्रिय

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

Narendra Patil | Sarkarnama

शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधवही इच्छुक

शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती.

Narendra Patil | Sarkarnama

आमचे दिल्लीला कोणीच नाही

नरेंद्र पाटील यांनी ‘आमचे दिल्लीला कोणीच नाही. उदयनराजे, तुम्ही दहा वर्षे लोकसभेचे नेतृत्व केले. राज्यसभेचेही तुम्ही नेतृत्व करत आहात. तुम्ही जसे दिल्लीला गेलात तसे आमचे मात्र दिल्लीत कोणीही नाही,’ असे सांगत सातारा लोकसभेसाठी दावेदारी केली आहे.

Narendra Patil | Sarkarnama

नरेंद्र पाटलांनी 2019 ची निवडणूक लढवली होती

नरेंद्र पाटील यांना 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने सातारा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना चार लाख 52 हजार 498 मते मिळाली होती.

Narendra Patil | Sarkarnama

सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा

सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा नरेंद्र पाटील यांनी नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. त्यानंतर नरेंद्र पाटील साताऱ्यात सक्रिय झाले आहेत.

R

Narendra Patil | Sarkarnama

पहिल्या टप्प्यात 'एवढे' उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; महाराष्ट्रातील किती?

representative photo | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा