बिगारी कामगार ते कॅबिनेट मंत्री, क्लर्कच्या लाचखोरीमुळे चर्चेत आलेल्या मंत्री झिरवाळांची कहाणी

Ganesh Sonawane

जन्म

नरहरी झिरवाळ यांचा जन्म 1 जून 1959 झाला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचे गाव.

Narhari Zirwal | Sarkarnama

बिगारीचे काम

कुटुंबातील परिस्थिती हलाखीची असताना उदरनिर्वाह करण्यासाठी बांधकामामध्ये बिगारीचे काम त्यांनी केले होते.

Narhari Zirwal | Sarkarnama

लिपीक

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मात्र त्या कामात त्यांचे मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली.

Narhari Zirwal | Sarkarnama

राजकारण

पुढे जनता दलाचे माजी खासदार कै. हरिभाऊ महाले यांच्यासोबत राहून झिरवाळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली.

Narhari Zirwal | Sarkarnama

सरपंच

त्यानंतर झिरवाळ यांनी गावच्या राजकारणात प्रवेश केला. ते वनारे गावाचे सरपंच झाले.

Narhari Zirwal | Sarkarnama

ZP सदस्य

सरपंचपदानंतर जनता दलातून पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रीय काँग्रेसमधून ते उपसभापती झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2001 साली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले.

Narhari Zirwal | Sarkarnama

चार वेळा आमदार

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 व 2019, 2024 असे चार वेळा आमदार झाले आहेत.

Narhari Zirwal | Sarkarnama

विधानसभा उपाध्यक्ष

२०२० मध्ये विधानसभा उपाध्यक्ष पदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्याकाळात झिरवाळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते.

Narhari Zirwal | Sarkarnama

कॅबिनेट मंत्री

आता ते राष्ट्रवादी पक्षात असून राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. क्लर्कच्या लाचखोरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Narhari Zirwal | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाचा पगार घेत नाहीत ममता बॅनर्जी, कसा भागवतात खर्च?

Mamata Banerjee | Sarkarnama
येथे क्लिक करा