Roshan More
नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या पाण्याच्या हक्कावर मोठा निर्णय झाला.20 वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर निकाली निघाला.
राज्याला मिळणाऱ्या 10 TMC पाण्याचा मार्ग आता मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री उपस्थित होते.
उकाई धरणातून 5 TMC पाणी उचलण्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली.
उकाईतील पाण्यासाठी महाराष्ट्र सरकार आराखडा तयार करणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठा फायदा होणार.
नर्मदा प्रकल्पातील अनेक आर्थिक प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा निघाला.महाराष्ट्रावर आता केवळ 27 कोटी रुपयांचे देयक शिल्लक राहणार.
केंद्राने कुसुम योजनेच्या एकूण निधीपैकी 51% निधी महाराष्ट्राला दिला. देशात सर्वाधिक निधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे आभार मानले.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन झाले. अक्षय ऊर्जा योजनांसाठी केंद्राकडून पुढेही सहकार्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.