Jagdish Patil
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केली.
या मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या चार समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर थेट डॉक्टरांवर हात उचलणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसवेक रमेश म्हात्रे नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया.
रमेश म्हात्रे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आहेत.
म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली परिसरातील एक प्रस्थापित राजकीय नेते आहेत.
यापूर्वी ते कल्याण-डोंबिवली महापालिकाच्या स्थायी समितीचे सभापतीही राहिले असून त्यांनी हे पद ४ वेळा भूषवलं आहे.
२०१९ मध्ये त्यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.
तर यंदाच्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.