Rashmi Mane
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर बिहारचे नर्मदेश्वर तिवारी यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जात आहे.
उपप्रमुख म्हणून नर्मदेश्वर तिवारी आता भारताच्या हवाई संरक्षणात आणि दहशतवादाविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार.
संपूर्ण देश आता भारतीय लष्कराच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. नर्मदेश्वर तिवारी यांच्याकडूनही मोठ्या जबाबदारीची अपेक्षा आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...
नर्मदेश्वर तिवारी बिहारच्या सिवान जिल्ह्यातील शरीकलपूर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते गांधीनगरमधील साउथ वेस्टर्न एअर कमांडचे कमांडर म्हणून कार्यरत आहेत.
नर्मदेश्वर तिवारी 1 मे 2025 पासून भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
एअर मार्शल तिवारी यांना रणनीतीची उत्तम समज आहे. त्यांना कुशल आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नेमणुकीने वायुसेनेच्या क्षमतेत वाढ होणार हे नक्की.