Jagdish Patil
अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरमधून गुरूवारी (ता.02) सकाळी नासाचे 4 अंतराळवीर चंद्र मोहिमेसाठी आकाशाकडे झेपावले.
अपोलो मोहिमेनंतर 50 वर्षे मानवाने पृथ्वीपासून एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास केलेला नाही.
नासाच्या 'आर्टेमिस-2' अभियानाद्वारे 4 अंतराळवीर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालतील आणि 10 दिवसांनी पृथ्वीवर परततील.
या मिशनद्वारे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच, तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन हे चंद्राची प्रदक्षिणा घालतील.
आर्टेमिस-2 मोहिमेत अंतराळवीरांना चंद्राजवळ पोहोचण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
या मोहिमेसाठी नासा सध्या त्यांच्याकडे असलेल्या सर्वात शक्तिशाली SLS रॉकेटचा वापर करत आहे.
आर्टेमिस 2 मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट हे अवकाशात 'ओरायन' अंतराळयानाच्या प्रणालींची चाचणी करणे हा आहे.
'हाई-एनर्जी री-एंट्री'ची चाचणी आणि आर्टेमिसच्या पुढील टप्प्यांसाठीचा मार्ग तयार करण्याचंही उद्दिष्ट या मिशनचं आहे.
अंतराळवीर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पृथ्वीच्या उच्च कक्षेत राहून ओरियनच्या महत्त्वपूर्ण प्रणालींची तपासणी करतील.