Ganesh Sonawane
नाशिकमधील तपोवनातील १८०० झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे.
मात्र तपोवनातील जागा साधूग्रामसाठी राखीव आहे. त्यामुळे झाडे तोडावी लागतील..दुसरी जागा नाही असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे म्हणणे आहे.
त्याबदल्यात १५ हजार झाडे लावू असा शब्द कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांना दिला आहे.
त्यानुसार नाशिक शहरात 15 हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
हरित नाशिक उपक्रमांतर्गत नाशिकच्या मखमलाबाद रस्त्यावरील भोईर मळ्यात वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली.
नाशिक महानगरपालिकेतर्फे विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यासह शहरातील आमदार, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच साधू-महंत उपस्थित होते.
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ही १५ हजार झाडे लावली जाणार असून टप्प्यात १ हजार झाडे लावल्यास सुरुवात केली.