Roshan More
भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नेमले आहे.
भाजपचा कार्यकारी अध्यक्ष हा पुढे राष्ट्रीय अध्यक्ष होता हा इतिहास आहे. त्यामुळे विविध नावांची चर्चा सुरू असताना नितीन नबीन यांची निवड म्हणजे मोदी-शाहांचा 'मास्टर स्ट्रोक' समजला जातोय.
नितीन नबीन हे बिहारमधील मंत्री आहे. संख्येने मोठ्या नसणाऱ्या मात्र कायम भाजपसोबत राहिलेल्या कायस्थ समाजातून ते येतात. त्यामुळे नबीन यांच्या निवडीने भाजपने जातीय समीकरण तोडल्याची चर्चा आहे.
नितीन नबीन हे बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. पाचव्यांदा ते आमदार म्हणून विजयी झाले आहे.
वडिलांच्या निधनानंतर नितीन हे पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले वयाच्या 26 व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले.
26 व्या वर्षी आमदार होणार नबीन हे वयाच्या 45 व्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत.
भाजपचा पुढील अध्यक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीय असेल असा अंदाज होता.मात्र, चर्चेत नसलेले नाव मोदी-शाहांनी समोर आणले आहे. त्यामुळे संघ नाराज असल्याची चर्चा आहे.