Ganesh Sonawane
जम्मू काश्मीरमधील पहेलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर शहरात मॉकड्रील घेण्यात आलं होतं.
परंतु त्यावेळी हवाई हल्ल्यांची सूचना देणारे भोंगे शहरात नसल्याची बाब निदर्शनास आली.
त्यामुळे आता महापालिका शहरात 12 ठिकाणी भोंगे बसवणार आहे.
या माध्यमातून हवाई हल्ल्याचा इशारा दिला जाणार आहे.
सदरचे भांगे हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिले जाणार असून 3.25 किलोमीटर भोंग्यांची रेंज असेल.
शहरात कोण कोणत्या ठिकाणी हे भोंगे बसवायचे त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे.
भोंगे बसल्यानंतर त्याची चाचणी घेऊन या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, पंचवटी विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, महापालिका शाळा क्रमांक ८९ पाथर्डी फाटा, अंबड फायर स्टेशन, अटलबिहारी वाजपेयी शाळा क्रमांक ४३ काठेगल्ली, शिवाजीनगर शाळा क्रमांक २० सातपूर, विश्वासनगर शाळा क्रमांक २४ सातपूर, विहितगांव शळा क्रमांक ६४, अमृतधाम फायर स्टेशन, हिरावाडी शाळा क्रमांक ८ पंचवटी.