Rashmi Mane
उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रशासनिक बदलात मेधा रूपम यांची नोएडाच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 2014 बॅचच्या धडाकेबाद IAS अधिकारी आहेत.
मेधा रूपम याआधी कासगंज जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये प्रभावी कामगिरी बजावली असून आता नोएडासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.
मेधाचा जन्म आग्रा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानेश कुमार असून ते सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
मेधा रूपम या केरल स्टेट शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडू होत्या. वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी सिव्हिल सेवा निवडली.
2014 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी IAS सेवा जॉईन केली. त्यांचं लग्न मनीष बंसल यांच्याशी झालं, जे सुद्धा 2014 बॅचचे IAS अधिकारी आहेत.
मेधा यांची पहिली पोस्टिंग बरेलीमध्ये झाली. त्यांनी मेरठ, उन्नाव, बाराबंकी, हापुड, ग्रेटर नोएडा आणि कासगंजमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
त्या ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या अतिरिक्त CEO म्हणून जेवर एअरपोर्ट व इंटरनॅशनल फिल्म सिटीसारख्या प्रकल्पांवर काम पाहिलं आहे.
कडक प्रशासक, खेळाडू, आणि आई अशा बहुआयामी भूमिका निभावणाऱ्या मेधा रूपम यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये गृहित धरलं जातं.