Deepak Kulkarni
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मला व प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर होती असा गौप्यस्फोट करत राजकीय वादळ उठवले.
या गौप्यस्फोटानंतर राजकीय खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे सोलापूरमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेच्या घरी जाऊन चाय पे चर्चा करून आले.
शिंदेच्या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा झाल्या.
चंद्रकांत पाटील सोलापुरात 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी आले होते.
काही वर्षांपूर्वी सोलापुरात नाट्य संमेलन झाले होते. त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे केंद्रीय ऊर्जामंत्री होते.
88 व्या नाट्य संमेलनानंतर पुन्हा शंभरावं नाट्य संमेलन सोलापूर शहरात होत आहे.
पाटील यांनी सुशीलकुमार यांना भाजपकडून ऑफरच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया दिली.
सुशीलकुमार शिंदे यांना 2019 किंवा आत्ता भाजपाकडून कोणीही त्यांना ऑफर दिलेली नाही”, असं पाटील म्हणाले.
पण भाजपातील एखाद्या नेत्याने आपल्या चांगल्या नात्याच्या आधारे सुशीलकुमारजी भाजपात येणार का किंवा मुलीला पाठवणार का? असे विचारले असेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हणत सस्पेन्स वाढवला...