Ganesh Sonawane
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या झाले.
कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, मात्र, ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे असं सरन्यायाधीश म्हणाले.
जवळपास 310 कोटी रुपये खर्च करून ही सात मजली पर्यावरणपूरक इमारत उभारलेली आहे.
विशेष हे की, एकाही जिल्हा न्यायालयात नसलेले 'एस्केलेटर' येथे आहे.
इमारतीत 45 न्यायालये, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सरकारी अभियोक्ता कक्ष, ग्रंथालय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पक्षकारांना बसण्यासाठी विस्तृत जागेची व्यवस्था आहे.
सुमारे 4 लाख चौरस फुटाचे बांधकाम असणारी ही पर्यावरणस्नेही इमारत उभारताना अद्ययावत सोयी सुविधांकडे बारकाईने लक्ष दिले गेले.
सध्याच्या नाशिक न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या पाठीमागील बाजूला ही इमारत आहे.
विविध प्रकारची शिल्पे, चित्र आणि वारली चित्रकला रेखाटली आहे. त्याच्याशी अनुरुप प्रकाश योजनेची सांगड घातली गेल्याने अंतर्गत भागास वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.
इमारतीत ४५ न्यायालयीन सभागृह आहेत. याव्यतिरिक्त न्यायालयीन कार्यालय, सरकारी अभियोक्ता कक्ष, ग्रंथालय, संगणक सर्व्हर कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुम, बँक एटीएम, टपाल कार्यालय आदींचा समावेश आहे.
इमारतीत वातानुकूलीत यंत्रणा, लीफ्ट, फर्निचर, अपंगासाठी रॅम्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावर सौर उर्जेसाठी यंत्रणा आदींचा अंतर्भाव आहे.