Jagdish Patil
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार आज शंभर वर्षे पूर्ण झाली. 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती.
नागपुरात मुख्यालय असलेल्या व जगभरातील सर्वात मोठं संघटन बनललेल्या संघाच्या शताब्दी वर्षांला आजपासून सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने संघाचा इतिहास जाणून घेऊया.
1925 सालच्या विजयादशमीला एका वाड्यात जमलेल्या काही मोजक्या तरुणांसोबत डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी संघाची स्थापना केली.
संघाने शंभर वर्षांत समाजकार्य, शिक्षण, सेवा, संस्कृती क्षेत्रांत काम केले असून संघाचे स्वयंसेवक देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत.
संघाची स्थापना झाली तेव्हा त्याचे नाव देखील ठरले नव्हते. 17 एप्रिल 1926 रोजी डॉ. हेडगेवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत 25 सदस्यांनी नावावर चर्चा केली.
या बैठकीतील 5 जणांनी जरीपटका मंडळ हे नावं सुचवलं तर काहींनी भारतोद्धारक मंडळ नाव सुचवलं पण त्याला कुणीही मत दिलं नाही.
त्यानंतर सुचवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाला 20 जणांनी समर्थन दिल्यामुळे अखेर तेच नाव लागू केलं.
सुरुवातीपासून हेडगेवार हे मार्गदर्शक होते मात्र 10 नोव्हेंबर 1929 रोजी स्वयंसेवकांच्या आग्रहास्तव संघस्थापनेनंतर जवळपास 4 वर्षांनी त्यांनी सरसंघचालक होणं मान्य केलं.
आज देशभरात 83 हजारांहून अधिक ठिकाणी दररोज शाखा लागतात. मात्र सुरूवातीला 15 दिवसांतून एका स्वयंसेवक भेटायचे, अशा पद्धतीने संघाची सुरूवात झाली आहे.