नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता कोणत्या भागात आणि का?

Ganesh Sonawane

ढगफुटी

नाशिक जिल्ह्यातील काही भागात मंगळवार (७ जुलै) रोजी मोठी ढगफुटी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

३०० एमएम

जवळपास ३०० एमएम पाऊस नाशिकमध्ये पडू शकतो. ही ढगफुटी मेजर असू शकते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

कमी दाब

अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भागात उद्या ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर

हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे ३०० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

निर्देश

अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत.

शाळांना सुट्टी

या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिकमधील शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत. विशेषत: त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी व नाशिक ग्रामीण या तालुक्यांमधील सर्व शाळा महाविद्यालये बंद राहतील.

मंदिर बंद

त्र्यंबकेश्वर व वणीचे मंदिर बुधवार (९ जुलै) सकाळपर्यंत दर्शनसाठी बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर व वणी येथे येण्याचे टाळावे.

पर्यटनस्थळे बंद

जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणे, गडकिल्ले, धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तेथे पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, आपदा मित्रांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

NEXT : पावसाचा एक थेंब अन् वीज गायब होण्यामागे 'ही' आहेत मोठी 5 कारणं

येथे क्लिक करा