Pradeep Pendhare
बनावट दस्तावेजावर सरकारी कोट्यातून सदनिका मिळवल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार माणिकराव कोकाटे आमदार म्हणून लगेच अपात्र होऊ शकतात.
1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 8(3) मध्ये शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीविरुद्ध अपात्रतेची कारवाईची तरतूद आहे.
कोणत्याही गुन्ह्यात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी नसेल, अशी शिक्षा झाल्यास शिक्षा ठोठावल्याच्या दिवसापासून सदस्य अपात्र ठरतो.
शिक्षा भोगून आलेल्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास तो अपात्र ठरवता येईल.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका यात निर्णायक ठरणार.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी याच कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई केली होती.
वरिष्ठ न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यास खासदारकी वा आमदारकी कायम राहू शकते.
विधानसभेचा सदस्य अपात्र ठरल्यास विधान परिषदेवर नियुक्त करून मंत्रिपदी कायम ठेवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.