गावातील अभ्यासिकेने बदललं आयुष्य ; एकाच गावातील 5 शेतकरी मुलांची पोलिस दलात एण्ट्री

Ganesh Sonawane

भूषण शेळके (१३० गुण)

या शेतकरी पुत्रांची शहरात जाऊन क्लास लावण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती, घरची शेती आणि प्रतिकूल परिस्थिती होती.

Nashik Success Story | Sarkarnama

पूनम सांगळे(१२९ गुण)

मात्र जिद्द, सातत्य आणि गावातच उभारलेल्या अभ्यासिकेच्या आधारावर दोनवाडे (ता. नाशिक) येथील पाच विद्यार्थ्यांनी थेट पोलिस दलात स्थान मिळविले.

Nashik Success Story | Sarkarnama

प्रमोद दळवी (१०७ गुण)

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाल्याचे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Nashik Success Story | Sarkarnama

माणिक दळवी (१३१ गुण)

जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ७५० हून अधिक ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ उभारण्यात आल्या आहेत.

Nashik Success Story | Sarkarnama

अजय भोर (१२२ गुण)

ग्रामीण विद्यार्थ्यांना गावातच स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Nashik Success Story | Sarkarnama

दोनवाडे

या उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या पहिल्याच अभ्यासिकेचे उद्घाटन दोनवाडे येथे करण्यात आले होते.

Nashik Success Story | Sarkarnama

पुस्तकांमध्ये रमायचे

अभ्यासिकेत रोज सायंकाळी विद्यार्थ्यांची उपस्थिती असायची. कुणी शेतीची कामे आटोपून यायचे, तर कुणी घरची जबाबदारी सांभाळून पुस्तकांमध्ये रमायचे.

Nashik Success Story

अभ्यासिका

मर्यादित साधनसामग्री असली तरी अभ्यासिकेने त्यांना मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत दिली.

Nashik Success Story | Sarkarnama

NEXT : आनंदाची बातमी ! कर्जमाफीला आचारसंहितेतून सूट; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

Farmer Loan Waiver | Sarkarnama
येथे क्लिक करा