Ganesh Sonawane
भारतात UPI आणि डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. कॅशऐवजी काही सेकंदांत ऑनलाइन व्यवहार करण्याला लोकांची पसंती मिळत आहे.
डिजिटल व्यवहारांसोबत ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणेही वाढली आहेत. बनावट कॉल, गुंतवणूक स्कॅम आणि डीपफेकच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत आहे.
वाढत्या फसवणुकीमुळे RBI नवीन सुरक्षा पर्यायांवर विचार करत आहे. सुरक्षा वाढवताना ग्राहकांचा पेमेंट अनुभव अबाधित ठेवण्यावर भर दिला जात आहे.
प्रत्येक UPI व्यवहाराला एक तासाचा विलंब लावण्यास बँकांचा विरोध आहे. सामान्य व्यवहार पूर्वीप्रमाणे तात्काळ पूर्ण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
संशयित व्यवहारात अॅपवर 'हा व्यवहार करायचा आहे का?' असा संदेश दिसेल. 'Yes' दाबल्यास व्यवहार होईल, 'No' निवडल्यास तो रद्द होईल.
ग्राहकाने कोणताही पर्याय निवडला नाही तर व्यवहार एक तासानंतर पूर्ण होईल. यामुळे फसवणुकीची शक्यता ओळखून निर्णय घेण्यासाठी वेळ मिळू शकतो.
रात्री उशिरा मोठी रक्कम, पहिल्यांदाच पैसे पाठवणे किंवा नव्या खात्यातील व्यवहार तपासले जाऊ शकतात. ₹10,000 किंवा त्याहून अधिक संशयित व्यवहारांवर विशेष लक्ष राहू शकते.
NPCI चे मत आहे की, जास्त निर्बंधांमुळे डिजिटल पेमेंटची गती आणि सुविधा कमी होऊ शकते. RBI सर्व प्रस्तावांचा अभ्यास करत असून, फसवणूक रोखणारे आणि ग्राहकांना सोयीचे नियम आणण्याची तयारी सुरू आहे.