Rashmi Mane
निवडणूक पार्श्वभूमीवर नाशिक रोड परिसरात मोठी खळबळ उडाली. रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एका गाडीला आडवले.
आडवलेल्या गाडीची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. नोटांचे बंडल पाहून सर्वांनाच धक्का बसला.
सारडा कन्या शाळा मतदान केंद्रावर पैशांच्या कथित वाटपावरून वाद निर्माण झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून माजी महापौर विनायक पांडे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
धुळे येथील एका संशयिताला पैसे वाटप करताना पकडण्यात आले. त्याच्या मोबाईलमध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
नाशिक रोड परिसरात पैसे वाटप करणाऱ्यांकडे बनावट शासकीय ओळखपत्र असल्याचा आरोप करण्यात आला. कार्यकर्त्यांनी संबंधित संशयितांना लोकांसमोर आणून प्रश्न उपस्थित केले.
या सर्व घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.