Deepak Kulkarni
महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड आता लवकरच सुरू होणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील हा मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे पुणे-मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ खूप कमी करणार असून अंतरही वाचणार आहे.
खोपोली एक्झिट आणि कुसगाव दरम्यान 13.3 किमीचा हा पर्यायी मार्ग असणार आहे. सध्या प्रवाशांना लोणावळा घाटातून जावे लागते, पण मिसिंग लिंक पूर्ण झाल्यावर खोपोली ते कुसगाव दरम्यानचा अवघड घाट टाळता येणार आहे.
मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई प्रवासाचे अंतर सुमारे 6 किमी कमी होणार असून 25 मिनिटे वाचणार आहे, तसेच या महामार्गावरील अवघड वळणे टाळता येणार आहे.
वैशिष्ट्ये: या प्रकल्पात देशातील सर्वात लांब 9 किलोमीटरचा बोगदा आणि सर्वात उंच पूल 185 मीटर बांधला जात आहे.
महायुती सरकारचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प मुंबई-पुणे प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मिसिंग लिंक प्रकल्पामुळे वाहतुककोंडी कमी होणार आहे.
जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे.