Ganesh Sonawane
आमदार देवयानी फरांदे व प्रा. सुहास फरांदे हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहे.
त्यांची कन्या सायली मात्र या राजकारणापासून दूर आहे. रेसिन आर्टच्या व्यवसायाद्वारे यशस्वी उद्योजिका म्हणून तिचे नाव झाले आहे.
महिला व पर्यावरण विषयावरील संस्थांच्या माध्यमातूनही सायली सक्रीय आहे.
आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी मात्र राजकारणात सक्रीय आहे.
आमदारांच्या कुटुंबात पद द्यायचे नाही या पक्षाच्या नियमामुळे अडचण आली. अन्यथा रश्मी आता नाशिक महापालिकेत नगरसेविका म्हणून दिसली असती.
आमदार सीमा हिरे यांची दुसरी कन्या ऋचा हिला मात्र राजकारणात रस नाही.
दोघी उच्चशिक्षीत असून रश्मी ही संगणक अभियंता तर ऋचा ही कायद्याची पदवीधर आहे.
सध्या, देवयानी फरांदे या नाशिक मध्य तर सीमा हिरे या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.