Ganesh Sonawane
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे अधिकृत संकेतस्थळ सुरू झाले आहे. कुंभमेळ्याची महत्त्वाची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.
पर्वणी स्नानाच्या तारखा, वेळा, महत्त्वाच्या घोषणा आणि धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माहिती शोधण्याची गरज कमी होणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय समजणार आहेत. स्थानिक प्रवासासंबंधी माहितीही टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.
कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि परंपरांची माहिती मिळेल. प्रमुख मंदिरे, घाट आणि आखाड्यांची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत केंद्रे आणि रुग्णालयांची माहिती दिली जाणार आहे. निवास व्यवस्था, वाहनतळ आणि मदत कक्षांची माहितीही मिळेल.
आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित सूचना उपलब्ध होणार आहेत. भाविकांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यावर भर देण्यात आला आहे.
शासकीय विभाग, महापालिका, धार्मिक संस्था आणि प्रसारमाध्यमांनी संकेतस्थळाची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या.
https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in