Ganesh Sonawane
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 13 आखाड्यांचे महंत या बैठकीला हजर होते.
31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होणार असून दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल.
तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या (शाही स्नान) तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.
पहिले अमृस्नान 2-08-2027
द्वितीय अमृस्नान 31-08- 2027
तृतीय अमृस्नान 12-09-2027
पहिले अमृस्नान 2-08-2027
द्वितीय अमृस्नान 31-08- 2027
तृतीय अमृस्नान 11- 09-2027
मागील कुंभमेळ्यांत शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी नियंत्रित करणे हे मोठे आव्हान ठरले होते. त्यामुळे यंदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तिसरे अमृतस्नान स्वतंत्र दिवशी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
देशभरातून आणि परदेशातून कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात मेळ्यात सहभागी होतात. साधू-संतांचे महामंडळ, विविध आखाडे आणि धार्मिक संस्था यांचंही मोठं योगदान असतं.