Roshan More
बाबा आढाव हे महाराष्ट्रातील प्रखर समाजवादी विचारवंत, कामगार नेते व जनआंदोलनाचे प्रतीक आहेत. त्यांनी शेतमजूर, हमाल व असंघटित कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष केला.
त्यांचा जन्म 1930 मध्ये पुण्यात झाला.1952 मध्ये त्यांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि पुण्यातील त्यांच्या नाना पेठेतील घरी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
संघर्षमय वाटचाल
1960 पासून असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आंदोलने केले.'हमाल पंचायत' या संघटनेची स्थापना हजारो हमाल कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून दिली.
जातीभेदाविरुद्ध बाबा आढाव उभे राहिले त्यांनी महाराष्ट्रभर 'एक गाव एक पाणवठा' चळवळ राबवली.
बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण जीवन कष्टकरी, हमाल,रिक्षाचालक यांच्यासाठी समर्पित केले. सामाजिक आंदोलनाचा ते चेहरा बनले.
राष्ट्र सेवा दलातील त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी भाई वैद्य , पन्नालाल सुराणा, बापू काळदाते यांच्यासह इतर समाजवादी नेत्यांसोबत काम केले.
आज (1 जून) बाबा आढाव यांचा 95 वा वाढदिवस आहेत. मात्र, या वयात देखील ते सामाजिक आंदोलनात आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांना सर्वात तरुण नेता म्हटले जाते.
1963 आणि 1968 मध्ये मध्ये त्यांनी नगरसेवक पुणे पालिकेत काम केले. नगरसेवक असताना त्यांनी वंचितांसाठी काम केले आणि झोपडपट्टीवासीयांसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रश्न सोडवले.