Ganesh Sonawane
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून सुमारे 40 हजार पोलिस नाशिकमध्ये येणार आहेत.
पोलिसांच्या निवासासाठी 127 मंगल कार्यालये व लॉन्सचा वापर केला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 67 लॉजेसचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
जुलै ते सप्टेंबर 2027 या कालावधीत पोलिसांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. मंगल कार्यालये, लॉन्स आणि लॉजेस 60 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात येतील.
ताब्यात घेतल्या जाणाऱ्या मालमत्तांच्या चालकांना शासनाच्या निकषांनुसार मोबदला दिला जाणार आहे. यासाठी संबंधित मालक-चालकांची बैठकही घेण्यात येणार आहे.
पोलिस ज्या ठिकाणी राहणार आहेत, त्याच ठिकाणी नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. भोजन तयार करून देण्याची जबाबदारी संबंधित चालकांवर असेल.
कुंभमेळ्यातील गर्दीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ड्यूटीवर जाणाऱ्या पोलिसांना निवासाच्या ठिकाणाहूनच गरम टिफिन दिला जाणार आहे.
फूड पॅकेट पोहोचण्यास विलंब होऊ नये, यासाठी टिफिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांना ड्यूटीच्या ठिकाणी वेळेत ताजे भोजन मिळणार आहे.
परजिल्ह्यांतून येणाऱ्या पोलिसांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. निवास, भोजन आणि वाहतुकीची व्यवस्था एकत्रितपणे केली जाणार आहे.