नाशिकच्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणदान

Ganesh Sonawane

कुंभमेळा

नाशिकमध्ये 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

श्रमदान

या कुंभमेळ्यात श्रमदान करुन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना २ श्रेयांक देण्यात येणार आहेत.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील जे महाविद्यालये येतात त्या महाविद्यालयांसाठी प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

प्रशासनाला मदत

दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि मनुष्यबळाची गरज भासते.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

विद्यार्थ्यांचा सहभाग

वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, गर्दी व आपत्ती व्यवस्थापन, CCTV आणि पर्यावरण संवर्धन. संशोधन व नियोजनासारख्या तांत्रिक कामांतही विद्यार्थ्यांचा सहभाग राहील.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

ठराव

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी हा ठराव मांडला होता. व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेत त्याला मंजुरी मिळाली आहे.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

प्रस्तावास संमती

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी प्रस्तावास संमती दिली.त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

60 तास काम

‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’ अंतर्गत दोन श्रेयांक देण्यात येणार आहेत.यासाठी विद्यार्थ्यांना किमान 60 तास काम करणे बंधनकारक असेल.

Nashik Kumbh Mela Students Credit | Sarkarnama

प्रमाणपत्र

श्रेयांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

kumbhmela | Sarkarnama

NEXT : कशी पार पडते महापौरपदाची निवडणूक? जाणून घ्या एका क्लीकवर..

येथे क्लिक करा