Ganesh Sonawane
कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती मिळावी यासाठी पर्यटन संचालनालयाने विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून स्थानिक युवकांना पर्यटन क्षेत्रात नवी रोजगार संधी मिळणार आहे.
नाशिक परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळांबाबत पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी युवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवकांना कुंभमेळ्याच्या काळात अधिकृत टूर गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (IITTM), ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत.
सात दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच कुंभमेळा कालावधीत टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 45 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी गुगल लिंकच्या माध्यमातून अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.