Jagdish Patil
तथाकथित अंकशास्त्रज्ञ असलेल्या अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
भोंदू गिरी आणि मंत्र तंत्राच्या नावाखाली त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं समोर आल्याने आलं आहे.
तर चौकशीत खरातची संपत्ती आणि राजकीय, प्रशासकीय कनेक्शनही उघड होत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे खरातला रूपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेत्यांनी आपला गुरू मानलं होतं.
मात्र, खरातचे खरे रंग समोर आल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तर अशोक खरात हा कॅप्टन वगैरे नसून केवळ दहावी पास खलाशी असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खरात मुळचा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीतील असून त्याचं शिक्षण फक्त दहावी पास आहे.
शिवाय तो मर्चट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर असल्याचं आणि त्याने 154 देशांचा प्रवास केल्याचं सांगितलं जातं.
मात्र, तो कॅप्टन नव्हे तर मर्चंट नेव्हीमध्ये खलाशी म्हणून नोकरी करायचा अशी माहिती त्याच्या जवळच्या लोकांनी दिली.
खरातने धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ समोर आल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.