Jagdish Patil
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केलेत.
चाकणकर तंत्र मंत्र विद्या करतात आणि यासाठी त्यांनी स्वत:च्या हाताची अनामिका कापल्याचा दावा त्यांनी केला.
तर चाकणकरांबाबत ही सर्व माहिती आपणाला एका पीडितेने दिल्याचंही अंधारेंनी सांगितलं.
दरम्यान, त्याच पीडितेने चाकणकरांच्या बोटाला दुखापत झालेले फोटो अंधारेंनी फेसबूकवर शेअर केलेत.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, विशिष्ट दिवशी अनामिका (करंगळीच्या शेजारचे बोट ) कापली आणि ज्या व्यक्तीवर तंत्र मंत्र करायचं आहे.
त्याच्या नावाच्या बाहुलीवर ते रक्त सांडले तर सूर्य, शुक्र ग्रह अनुकूल होतात आणि आशीर्वादित करतात असा समज आहे.
9 सप्टेंबर 2024 चा चाकणकरांच्या इन्स्टाग्रामवरील फोटो दाखवत बोटाची जखम मोठी असल्याचं अंधारेंनी सांगितलं.
ही जखम सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत दिसत असून स्वयंपाक घरात झालेली जखम 3-4 महिने राहत नसल्याचंही त्या म्हणाल्या.
2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या होती हे गंभीर असून याबाबतची माहिती तपास अधिकाऱ्यांनी पडताळावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हे फोटो शेअर करत चाकणकरांनी तंत्र मंत्र करण्यासाठीच बोट कापल्याचं अंधारेंनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.