Ganesh Sonawane
नाशिककरांना आता थेट ऑनलाइन पद्धतीने पोलिस आयुक्तांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ‘ई-मीट’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कम्युनिटी पोलिसिंगअंतर्गत हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आणि पोलिस प्रशासनातील संवाद अधिक मजबूत होणार आहे.
दर मंगळवारी नागरिकांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संवाद साधता येईल. तक्रारी व अडचणी थेट आयुक्तांसमोर मांडता येणार आहेत.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीची सुविधा पोलिस आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संकेतस्थळावर ‘ई-मीट’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपली माहिती आणि संवादासाठी इच्छित तारीख-वेळ नोंदवावी लागेल.
नागरिकांना आपल्या तक्रारी आणि सूचना थेट मांडण्याची संधी मिळेल. ऑनलाइन संवादाद्वारे त्या लगेच पोहोचवल्या जाऊ शकतात.
मांडलेल्या तक्रारी व सुचनांची पोलिस आयुक्त स्वतः दखल घेतील. यामुळे तक्रारींवर जलद कारवाई होण्याची शक्यता आहे.
‘पोलिस आयुक्त आपल्या दारी’ उपक्रमासोबतच ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे नाशिककरांना प्रत्यक्ष तसेच डिजिटल पद्धतीने संवाद साधता येणार आहे.