Ganesh Sonawane
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' ही मोहीम सुरु केली आहे.
संदीप कर्णिक यांचे वेगळेपण हे आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही पक्षातील पदाधिकाऱ्याला व कार्यकर्त्याला त्यांनी माफ केले नाही.
संदीप कर्णिक यांच्या कारवायांमध्ये सर्वात अधिक कारवाया या सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांवर झाल्या आहेत.
संदीप कर्णिक हे 2004 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी आहेत.
संदीप कर्णिक यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी (बीई), मार्केटिंगमध्ये एमबीए आणि पोलिस व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.
संदीप कर्णिक यांनी एप्रिल २०२२ मध्ये पुण्यात सह पोलिस आयुक्तपदही भूषवले. यापूर्वी त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये नाशिक पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचा शेवट करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.
संदीप कर्णिक यांच्या कार्यामुळे नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे.
मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली होती.