Ganesh Sonawane
दिवाळीत चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर अचानक नाकाबंदी.
संशयित वाहनांची तपासणी करून चेन स्नॅचर्सवरही पोलिसांचे लक्ष.
शहरातील सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी सुरू.
गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर.
बिट मार्शल आणि गुन्हे शाखेची विशेष पथके संवेदनशील भागांत तैनात.
दिवस-रात्र गस्त घालण्याची जबाबदारी विशेष पथकांकडे.
मध्यवर्ती बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला.
वाहनांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी विशेष बॅरिकेडिंग.
गर्दीच्या बाजारपेठांमध्ये साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात.
चोरी आणि दागिने हिसकावण्याच्या घटनांवर लक्ष ठेवणार.
अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला.
संशयित वाहनांची तपासणी करून हालचालींवर लक्ष ठेवले जाणार.
नियमित गस्तीव्यतिरिक्त शहरात अधिकची पोलीस कुमक पाचारण.
स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांवर विशेष जबाबदारी.
मुख्य बाजारपेठांमध्ये लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.
गर्दीत दागिने आणि मौल्यवान वस्तू सांभाळण्याच्या सूचना.