घरमालकांनो सावधान, नाशिक पोलिस आयुक्तांची भाडेकरूंसाठी कडक नियमावली

Ganesh Sonawane

भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक

घरमालकांनी भाडेकरूंचा फोटो, मूळ रहिवासी पुरावा आणि भाडेकरारनामा स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करावा. नोंदणी नाशिक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरही करता येईल.

Nashik News | Sarkarnama

हॉटेल्स, लॉज आणि धार्मिकस्थळांनाही नियम

हॉटेल्स, लॉजेस, धर्मशाळा तसेच मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारांच्या संचालकांनी तेथे राहणाऱ्या नागरिकांची माहिती पोलिसांना द्यावी.

Nashik News | Sarkarnama

परदेशी नागरिकांच्या नोंदी आवश्यक

परदेशी नागरिक राहात असल्यास त्यांचा पासपोर्ट, व्हिसाची छायांकित प्रत आणि ‘सी’ फॉर्म संबंधित पोलिस ठाणे व पारपत्र शाखेकडे सादर करणे बंधनकारक आहे.

Nashik News | Sarkarnama

जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर लक्ष

जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे व्यवहार करणाऱ्यांनी खरेदीदार व विक्रेत्यांचे नाव आणि पत्ता यांची अद्ययावत माहिती पोलिसांना लेखी स्वरूपात द्यावी.

Nashik News | Sarkarnama

सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफेही रडारवर

बोगस सिमकार्ड आणि इंटरनेटच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ग्राहकांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि ओळखपत्राची माहिती अद्ययावत ठेवून पोलिसांना सादर करावी.

Nashik News | Sarkarnama

भंगार विक्रेते आणि फेरीवाल्यांसाठी नियम

भंगार साहित्याचा गैरवापर रोखण्यासाठी भंगार खरेदी-विक्री करणाऱ्यांसह फेरीवाल्यांनी आपल्या व्यवहारांची नोंद पोलिसांना देणे आवश्यक आहे.

Nashik News | Sarkarnama

सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनाही आदेश

सुरक्षा रक्षक आणि मनुष्यबळ पुरवणाऱ्या एजन्सींनी कर्मचाऱ्यांचे नाव, पत्ता, ओळखपत्र तसेच लागू असल्यास शस्त्र परवान्याची अद्ययावत माहिती पोलिसांना द्यावी.

Nashik News | Sarkarnama

पुढील 60 दिवस आदेश लागू; उल्लंघन केल्यास कारवाई

सणासुदीच्या काळात घातपाताची शक्यता नाकारता येत नाही त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

Nashik News | Sarkarnama

NEXT : कायद्यातील 'या' दोन कलमांच्या आधारे पोलिसांनी CJP नेत्यांची केली कोंडी

Abhijeet dipke | Sarkarnama
येथे क्लिक करा