Ganesh Sonawane
देवयानी फरांदे या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
विरोधी पक्षातील नेत्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार फरांदे यांचा विरोध झुगारुन प्रवेश दिल्याने त्या नाराज झाल्या.
माध्यमाशी बोलताना त्या भावूक झाल्या होत्या. महाजनांपुढे त्या हतबल झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात त्या तिसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. २५ ते ३० वर्षांपासून त्या राजकारणात आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने फरांदे यांच्यावर निवडणुक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.
फरांदे कुटुंबाला मोठा राजकीय वारसा असून त्यांचे सासरे प्रा. ना. स. फरांदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे उपसभापती आणि नंतर सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
देवयानी फरांदे या १९९७ मध्ये पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवून त्या नगरसेविका झाल्या. तेव्हापासून सलग तीनवेळा म्हणजे २०१४ पर्यंत त्या नगरसेविका होत्या.
दरम्यान तीन वर्ष त्यांनी नाशिकच्या उपमहापौर म्हणूनही काम केले.
त्यांचे नेतृत्व पाहाता भाजपने त्यांच्यावर प्रदेश महिला मोर्चाच्या चिटणीसपदाची जबाबदारी सोपविली होती. नऊ वर्षे ही धुरा त्यांनी सांभाळली.