Mayur Ratnaparkhe
आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून जुन्याच सर्वेक्षणानुसार रेल्वे मार्ग होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
दिलीप वळसे पाटील
या संदर्भात आयोजित बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हजर होते.
आमदार शरद सोनवणे
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे हे या बैठकीस ऑनलाईन हजर होते.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
याशिवाय सध्या चर्चेत असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचीह बैठकीस उपस्थिती होती.
आमदार अमोल खताळ
काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांना पराभूत करून संगमनेरचे आमदार झालेले अमोल खताळही बैठकीस हजर होते.
खासदार अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.
आमदार बाबाजी काळे
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांचीही या बैठकीस ऑनलाईन हजेरी होती.
खासदार राजाभाऊ वाजे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचीही बैठकीस ऑनलाईनच उपस्थिती होती.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनीही बैठकीस ऑनलाईन सहभाग नोंदवला होता.
शिवाजीराव आढळराव पाटील
मात्र या प्रकल्पाचे प्रवर्तक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा या बैठकीत समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.