Ganesh Sonawane
सन २०२६-२७ मध्ये राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
रब्बी ज्वारी, गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका आणि रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे. उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भातालाही विमा संरक्षण मिळणार आहे.
रब्बी ज्वारीचा विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका आणि रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांनी ही अंतिम मुदत लक्षात ठेवावी.
उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा उतरवण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जाची मुदत संपणार आहे.
रब्बी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के, तर उन्हाळी नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित केला आहे.
शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि डिजिटल पीक सर्वेक्षणातील पीक नोंदणी बंधनकारक आहे. प्रत्येक अर्जासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्र आवश्यक असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात.
pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. बँक, विमा कंपनीचे प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स अॅप आणि सामूहिक सेवा केंद्रांमार्फतही नोंदणी करता येणार आहे.