शेतकऱ्यांनो, चिमुटभर माती अन् काही सेकंदात रिपोर्ट! शेतातच असे करा माती परीक्षण...

Rajanand More

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माती परीक्षणासाठी आता AI आधारित सेन्सर उपलब्ध झाले असल्याचे म्हटले आहे. सेन्सरच्या मदतीने शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण काही मिनिटांत अचूक करता येईल, असेही ते म्हणाले.

PM Narendra modi | Sarkarnama

मोबाईल

मोबाईलच्या मदतीनेही मातीची गुणवत्ता तपासता येते. यासाठी मोबाईलशी जोडलेल्या उपकरणावर थोडीशी माती ठेवावी लागते. त्यानंतर काही मिनिटांतच मोबाईलवर मातीचे रिपोर्ट कार्ड उपलब्ध होते.

Soil Testing | Sarkarnama

काय माहिती?

रिपोर्ट कार्डमध्ये कोणत्या पिकासाठी जमीन योग्य आहे, किती खतांची आवश्यकता आहे आणि कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करावा, याची माहिती मिळू शकते.

Soil Testing | Sarkarnama

उपकरणे

माती परीक्षणासाठी अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. त्यापैकी Bhu-Parikshak उपकरण आयआयटी कानपूरने विकसित केले असून केवळ ९० सेकंदांत मातीचे परीक्षण होते.

Soil Testing | Sarkarnama

रसायनाचा वापर नाही

परीक्षणासाठी रासायनिक पदार्थांची गरज भासत नाही. भू-परीक्षक उपकरण कोरड्या मातीच्या नमुन्याचे Near Infrared तंत्रज्ञानाने परीक्षण करते.

Soil Testing | Sarkarnama

भू परीक्षक

या उपकरणावर माती परीक्षणासाठी सुमारे ५ ग्रॅम कोरड्या मातीचा नमुना आवश्यक असतो. कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर न करता परीक्षण केले जाते. जवळपास ९० सेकंदांत मातीचे विश्लेषण होते.

Soil Testing | Sarkarnama

प्रयोगशाळा

माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. बाजारात भू परीक्षक सारखी काही पोर्टेबल उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने शेतातच मातीची तपासणी करता येते. त्यांचा अहवाल मोबाईल अ‍ॅपवर पाहता येतो.

Soil Testing | Sarkarnama

खरेदी करताना काळजी

परीक्षणासाठी एखादे उपकरण खरेदी करताना त्याची अचूकता, परीक्षणाचे निकष आणि प्रयोगशाळेतील अहवालाशी त्याची पडताळणी झाली आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. ICAR ने मातीच्या परीक्षणासाठी १२ निकष सांगितले आहेत.

Soil Testing | Sarkarnama

NEXT : महिला जिल्हाधिकारी थेट केंद्रीय मंत्र्यांना खेचणार कोर्टात? 75 लाखांची लाच प्रकरण तापले...

येथे क्लिक करा.