Ganesh Sonawane
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. कुंभमेळ्यात AI चा प्रभावी वापर केला जाणार आहे.
या कुंभमेळ्यात सुमारे 12 कोटी भाविक सहभागी होतील अशी अपेक्षा असून एका दिवशी २.५ कोटी भाविकांची उपस्थिती राहू शकते.
विकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘कुंभदूत’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल सहाय्यक विकसित करण्यात येत आहे, जो 24 तास उपलब्ध असेल.
साध्या मोबाईल फोनपासून ते स्मार्टफोनपर्यंत ‘कुंभदूत’ सर्वांसाठी उपलब्ध राहणार असून मार्ग, ठिकाणे आणि सुविधा यांची संपूर्ण माहिती सहज मिळणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी AI, ड्रोन, सेन्सर्स आणि मोबाईल डेटा यांचा वापर करून संभाव्य गर्दीचा अंदाज आधीच घेता येणार आहे आणि त्यानुसार उपाययोजना करता येतील.
नाशिकमध्ये सध्या असलेल्या CCTV यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी आणखी 4000 कॅमेरे बसवले जाणार असून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
व्हॉट्सअॅप, मोबाईल ॲप, IVR आणि सार्वजनिक घोषणांद्वारे भाविकांना सतत मार्गदर्शन मिळणार आहे. मेळ्यात आपण हरवणार नाही यासाठी ‘कुंभदूत’ ची मदत घेता येईल.
‘प्रेडिक्टिव’ तंत्रज्ञानामुळे संभाव्य अडचणी आधीच ओळखून उपाययोजना करता येणार असून 2027 चा कुंभमेळा देशातील सर्वात स्मार्ट आणि सुरक्षित मेळा ठरणार आहे.