नाशिक TCS प्रकरणात ‘इनकॅमेरा’ सुनावणी, म्हणजे नेमकं काय असतं?

Ganesh Sonawane

TCS प्रकरण

नाशिकमधील TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरण सध्या चर्चेत आहे.

TCS Nashik case | Sarkarnama

‘इनकॅमेरा’

SIT पथकाच्या विनंतीनुसार या प्रकरणाची सुनावणी ‘इनकॅमेरा’ चालवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे.

TCS Nashik case | sarkarnama

बंद खोलीत

‘इनकॅमेरा’ सुनावणी म्हणजे न्यायाधिशांच्या दालनात किंवा बंद खोलीत असा होतो.

in camera hearing meaning | sarkarnama

बाहेरच्यांना नो एण्ट्री

या सुनावणीदरम्यान न्याय कक्षाचे दरवाजे बंद केले जातात आणि बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जातो.

TCS Nashik case | sarkarnama

कोण उपस्थितीत राहू शकता

या सुनावणीसाठी केवळ न्यायाधीश, दोन्ही पक्षकारांचे वकील, फिर्यादी (पीडित), आरोपी आणि न्यायालयाचे आवश्यक कर्मचारीच उपस्थित राहू शकतात.

TCS Nashik case | sarkarnama

प्रसार माध्यमांना प्रवेश नाही

‘इनकॅमेरा’ सुनावणीत सर्वसामान्य जनता किंवा प्रसार माध्यमांना प्रवेश नसतो.

in camera hearing meaning | Sarkarnama

उद्देश

पीडित व्यक्ती किंवा साक्षीदाराची ओळख उघड होऊ नये आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर सामाजिक परिणाम होऊ नये हा या सुनावणीमागचा मुख्य उद्देश असतो.

TCS Nashik case | sarkarnama

खटले

प्रामुख्याने बलात्कार, लैंगिक अत्याचार, पॉक्सोअंतर्गत गुन्हे, वैवाहिक वाद किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील खटल्यांमध्ये इनकॅमेरा सुनावणी घेतली जाते.

in camera hearing meaning | sarkarnama

निर्भयपणे जबाब

इनकॅमेरा सुनावणीमुळे पीडित व्यक्तीला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता येते.

in camera hearing meaning | Sarkarnama

NEXT : महिला आरक्षणावरून देशभरात रान उठवणाऱ्या भाजपने बंगालमध्ये किती महिलांना दिली संधी? TMC पेक्षा कमी की जास्त...

women reservation bill india | Sarkarnama
येथे क्लिक करा