Jagdish Patil
पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
संसदेत केंद्र सरकारने मांडलेले महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
संसदेत सर्वच पक्ष महिला आरक्षणासाठी आग्रही असले तरी प्रत्यक्षात त्यांनी किती महिलांना निवडणुकीत संधी दिलेय ते पाहू या.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सर्वाधिक 27 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे.
तृणमूल काँग्रेसनेच्या एकूण 291 उमेदवारांपैकी 52 महिला उमेदवार आहेत.
सीपीआय डाव्या पक्षांसोबत आघाडी करुन 235 जागा लढत आहे. त्यापैकी 34 जागांवर म्हणजेच 13 टक्के महिला उमेदवार आहेत.
काँग्रेसने 12 टक्के महिलांना संधी दिली आहे. 294 जागांपैकी 35 महिलांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
तर महिला आरक्षणासाठी आग्रही असलेल्या भाजपने या निवडणुकीत केवळ 11 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे.
भाजप पश्चिम बंगालमध्ये 294 जागा लढवत असून त्यांनी 33 जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे.
वरील आकडेवारी बघता महिला आरक्षणासाठी आग्रही असलेल्या भाजपनेच महिलांना सर्वात कमी संधी दिल्याचं दिसत आहे.