Ganesh Sonawane
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. ३१ ऑक्टोबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकमधील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे एकाच मुहूर्तावर ध्वजारोहण होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते नाशिक येथे ध्वजारोहण होईल.
त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे राष्ट्रपतींच्या हस्ते १२ मिनिटे गोदापूजन केले जाईल.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजेसाठी सुमारे १५ मिनिटांचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती येण्यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे.
६५ ते ७० वर्षांनंतर येणारा त्रिखंडाचा योग यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येत आहे. तसेच आद्य शंकराचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि असून राष्ट्रपतींच्या हस्ते गोदापूजन हे दोन्ही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आले आहेत.
त्र्यंबकला आखाड्याच्या साधु-महंतांना मुख्यमंत्र्यांच्या व शंकराचार्यांच्या रांगेत बसविले जाणार आहे. आमदार व खासदारांच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. फक्त नगरपालिकेच्या नगरसेवकांना सपत्नीक उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.