नाशिक सिंहस्थ 2027 : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; आजच QR कोड स्कॅन करून व्हा 'कुंभदूत'

Ganesh Sonawane

सिंहस्थ

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी 'कुंभदूत' उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Nashik Kumbhdoot | Sarkarnama

'कुंभ कक्ष'

जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र 'कुंभ कक्ष' स्थापन केला जाणार आहे.
हा कक्ष कुंभमेळा प्राधिकरण आणि संस्थेमधील समन्वयाचे केंद्र असेल.

Nashik Kumbhdoot | Sarkarnama

नोंदणी

इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
QR कोड स्कॅन करून विद्यार्थी सहजपणे सहभागी होऊ शकतात.

Nashik Kumbhdoot | Sarkarnama

काय करावे?

नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक संस्थेचा तपशील भरायचा आहे. यानंतर प्रशिक्षण व स्वयंसेवक नियोजनाची प्रक्रिया सुरू होईल.

Nashik Kumbhdoot | Sarkarnama

जबाबदारी

घाट, मंदिरे, रेल्वे स्थानके, वाहनतळ, आरोग्य केंद्रे आणि मदत शिबिरांमध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल. भाविकांना मदत करण्याची महत्त्वाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर असेल.

Nashik Kumbhdoot | Sarkarnama

आवाहन

राष्ट्रीय आणि आध्यात्मिक महत्त्वाच्या सिंहस्थासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Kumbhdoot | Sarkarnama

NEXT : शालेय बस-व्हॅनसाठी आता सरकारचे नवे नियम; प्रत्येक पालकाने वाचायलाच हवे

येथे क्लिक करा