मुदतीच्या एक वर्ष आधीच काम पूर्ण, कशी आहे नाशिक झेडपीची नवीन इमारत?

Ganesh Sonawane

नवीन इमारत

त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम मुदतीच्या वर्षभर आधीच पूर्णत्वास आले आहे.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

इमारतीची पाहणी

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपअभियंता राजेंद्र मोरे, अभिजित बनकर उपस्थित होते.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

सहा मजले

जिल्हा परिषदेच्या या भव्य इमारतीत एकूण सहा मजले असून, पहिल्या व दुसऱ्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे. तळमजल्यावर १०८ चारचाकी गाड्या बसतील. तर ४०० दुचाकी बसतील एवढी जागा आहे.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

पहिल्या मजल्यावर

महिला व बालविकास विभाग, समाजकल्याण, आवक-जावक विभाग यांना जागा देण्यात आली आहे.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

दुसरा मजला

हा सीईओ कार्यालय, मीटिंग रूम, ग्रामपंचायत विभाग, पाणीपुरवठा, अर्थ, सामान्य प्रशासन विभागांना असणार आहे.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

तिसऱ्या मजल्यावर

अध्यक्ष कार्यालय, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभागांची कार्यालये आहेत.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

चौथा मजला

समिती सभागृह, कृषी, पशुसंवर्धन, डीआरडीए व सभागृहासाठी देण्याचे नियोजन असून, पाचव्या मजल्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा, जलसंधारण, मनरेगा विभाग आहेत.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

6 वा मजला

सहाव्या मजल्यावर बांधकामाचे सर्व विभाग राहतील, अशा स्वरूपाची रचना आहे.

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

इमारतीचे वैशिष्ट्ये

- स्वतंत्र ग्रंथालय, कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजन कक्ष, कर्मचारी व अभ्यागतांसाठी उपाहारगृह, बहुउद्देशीय सभागृह (परिषद, प्रशिक्षण, कार्यक्रम), महिलांसाठी विश्रांतीगृह ‘हिरकणी कक्ष’चार लिफ्ट, अ‍ॅम्फी थिएटरयुक्त प्रांगण, सीसीटीव्ही, हरित इमारतीचे बांधकाम, सार्वजनिक सुविधा केंद्र, बँकांचे कार्यालय

Nashik Zilla Parishad | Sarkarnama

NEXT : लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी सरकारची आणखी एक कल्याणकारी योजना! लगेच तपासा पात्रता अन् अर्ज प्रक्रिया !

Women Scheme | Sarkarnama
येथे क्लिक करा