Ganesh Sonawane
नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमाच्या माध्यमातून आयआयटीत प्रवेश मिळवलेल्या सहा ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील नासा या जागतिक संशोधन व अंतराळ संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे.
हा दौरा संपूर्ण आठवडाभर चालणार असून, विद्यार्थ्यांना नासाबरोबरच अमेरिकेतील अन्य प्रतिष्ठित विज्ञान-तंत्रज्ञान संस्था, संशोधन प्रयोगशाळा आणि विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देण्याचा अनुभव मिळणार आहे.
यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होईल आणि जागतिक ज्ञानाशी त्यांची थेट नाळ जुळेल. या दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषदेतील एक शिक्षकही सहभागी होणार असून त्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
आकांक्षा शेजवळ : निफाड तालुक्यातील कुंभारे या गावच्या आहेत.
वृषाली वाघमारे : या मनमाड येथील रहिवासी आहेत.
डिंपल बागुल : या कळवण तालुक्यातील मेहदर येथील रहिवासी आहे.
हर्षल ढमाले : हा सिन्नर येथील आहे.
मेघा डहाळे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फडाळवाडी येथील आहेत.
जागृती शेवाळे : या कळवण तालुक्यातील मोकभनगी येथील आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी या विद्यार्थ्यांना नासात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.