Sunil Balasaheb Dhumal
अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत.
नाशिकमध्ये आगमन होताच ठाकरेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे २३ जानेवारीला अधिवेशन आहे.
त्यासाठी आलेल्या ठाकरेंच्या स्वागतासाठी ओझर विमानतळावर गर्दी झाली होती.
ठाकरेंनी सर्वप्रथम भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला हार घालून उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले.
ठाकरे यांच्यासमवेत 100 हून अधिक वाहनाचा ताफा होता.