Jagdish Patil
अमेरिकेत 'व्हाईट हाऊस' बाहेर सिक्रेट सर्व्हिसच्या चेकपॉइंटवर शनिवारी (ता.२३) गोळीबाराची घटना घडली.
गोळीबाराची घटना घडली तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते.
गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली असून नासीर बेस्ट असं त्याचं नाव आहे.
हल्लेखोर मानसिकदृष्ट्या त्रस्त असून याआधीही चेकपॉईंट्सजवळून त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी अनेकदा हाकललं होतं.
तर नासीर बेस्टला तो येशू ख्रिस्ताचा आधुनिक अवतार असल्याचा भ्रम होता, असं तपासातून समोर आलं आहे.
त्यामुळे हा हल्ला त्याच्या मानसिक अस्वास्थ्यामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे.
यापूर्वी, बेस्टला व्हाईट हाऊसच्या परिसरापासून दूर राहण्याचे न्यायालयीन आदेश होते. मात्र, त्याचं उल्लंघन केलं.
दरम्यान, सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नासीर गंभीर जखमी झाला होता.
त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.