ट्रोलिंगमुळे चर्चेत आलेली जितेंद्र आव्हाडांची लेक नताशा काय करते?

Jagdish Patil

नताशा आव्हाड

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशाला सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केलं गेलं.

Natasha Awhad, Jitendra Awhad daughter | Sarkarnama

ट्रोल

आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाने आपणाला ट्रोल केल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत नताशाने संताप व्यक्त केला आहे.

Natasha Awhad, Jitendra Awhad daughter | Sarkarnama

ट्विट

'जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी काहीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांनी मला यात ओढले, असं ट्विट करत तिने CM फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं.

Natasha Awhad, Jitendra Awhad daughter | Sarkarnama

चर्चा

या ट्विटनंतर नताशा पुन्हा एकदा चर्चेत आली असून ती सध्या नेमकं काय करते? तिचं शिक्षण किती झालं आहे, याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Natasha Awhad, Jitendra Awhad daughter | Sarkarnama

शिक्षण

नताशा मुंबईतील सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये शिकली असून त्यानंतरच्या शिक्षणासाठी ती स्पेनला गेली. तिने M.Tech पदवी घेतली आहे.

Natasha Awhad, Jitendra Awhad daughter | Sarkarnama

विवाह

डिसेंबर 2021 मध्ये एलन पटेलसोबत तिचा विवाह झाला. एलन हा नताशाचा शाळकरी मित्र असून दोघांनी स्पेनमध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे.

Natasha Awhad Troll Controversy Marriage Details | Sarkarnama

साधेपणा

आव्हाडांनी अत्यंत साधेपणाने आणि रजिस्टर पद्धतीने या दोघांचं लग्न लावलं होतं. ज्याची चर्चा संबंध महाराष्ट्रात झाली होती.

Natasha Awhad Troll Controversy Marriage Details | Sarkarnama

फोटो

त्यानंतर गोव्यात पुन्हा ख्रिश्चन पद्धतीने विवाह पार पडला तेव्हाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Natasha Awhad Troll Controversy Marriage Details

राजकारण, समाजकारण

नताशा वडिलांच्या प्रचारात सक्रीय असते. राजकारणासह सामाजिक सहभागाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Natasha Awhad Troll Controversy Marriage Details | Sarkarnama

NEXT : पडळकरांसाठी आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडणाऱ्या ऋषिकेश टकलेची हिस्ट्री काय?

Gopichand Padalkar's supporter Rishikesh Takale background | Sarkarnama
क्लिक करा