J&K Assembly Election 2024 : 15 वेळा जीवघेणा हल्ला; कोण आहेत सकिना इटू?

Pradeep Pendhare

राजकीय सुरवात

सकिना इटू यांनी नूराबादमधून दोन वेळा नॅशनल कॉन्फरन्सच्या तिकिटावर 1996 आणि 2008, अशी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली.

Sakina Itoo | Sarkarnama

वडिलांची हत्या

1996 साली 26 व्या वर्षी त्यांच्या विजयात त्यांचे दिवंगत वडील वली मोहम्मद इटू यांचा मोठा वाटा होता. मोहम्मद इटू यांनी 1972 पासून 1994 सालापर्यंत मतदारसंघाचं नेतृत्व केलं.

Sakina Itoo | Sarkarnama

शिक्षण सोडलं

मोहम्मद इटू यांची हत्या होईपर्यंत ते या मतदारसंघाचे आमदार होते. वडिलांच्या हत्येनंतर सकिना यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण अर्धवट सोडून राजकीय जीवनात प्रवेश केला.

Sakina Itoo | Sarkarnama

15 वेळा हल्ले

किमान 15 वेळा जीवघेणा हल्ला झाल्याचा दावा सकिना इटू यांनी केला आहे. 1994 साली दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानं पायाला मोठी दुखापत झाल्याचं त्या सांगतात.

Sakina Itoo | Sarkarnama

शिक्षण मंत्री

सकिना इटू यांनी 1996 ते 1999 या काळात फारुख अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २००२ पर्यंत त्यांनी पर्यटन मंत्रीपदाचीही जबाबदारी सांभाळली.

Sakina Itoo | Sarkarnama

महिला कल्याण मंत्री

2008 ते 2014 या काळातही त्या महिला कल्याण मंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात होत्या.

Sakina Itoo | Sarkarnama

भाजपवर निशाणा

भाजपानं फक्त आमची ओळखच हिरावून घेतली नसून मानव म्हणून आमचा आवाजही त्यांनी हिसकावून घेतला. गेल्या 10 वर्षांतली इथली हुकुमशाही आता संपणार आहे.

Sakina Itoo | Sarkarnama

मतदारांना आवाहन

अन्याय, सक्ती आणि हिंसेला असणारा स्थानिकांचा प्रतिसाद कठोर असायला हवा, असं आवाहन सकिना इटू मतदारांना करतात.

Sakina Itoo | Sarkarnama

NEXT : अंगणवाड्या उजळणार सौरदिव्यांनी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

येथे क्लिक करा :