Aslam Shanedivan
यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असून यासाठी उमेदवार अहोरात्र मेहनत घेतात
पण सर्वच उमेदवार यात यशस्वी होतात असे नाही. अथक मेहनत आणि कठोर परिश्रम असणारेच या परीक्षेत यशाचा झेंडा रोवतात
यूपीएससी परीक्षेत असेच यश ग्रेटर नोएडा येथील इशिता किशोर हिने मिळवले असून तिने तिसऱ्या प्रयत्नात देशात पहिला क्रमांक मिळवला
लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इशिता किशोरला यूपीएससी परीक्षेत दोन वेळी अपयश आले होते.
इशिता किशोर हिने श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केले असून ती राष्ट्रीय फुटबॉलपट्टू होती.
तिचे वडील एअरफोर्समध्ये ऑफिसर असल्याने इशिता नेहमीच अभ्यासात हुशार होती. पण पहिल्या दोन प्रयत्नात प्रिलियम्सच्या टप्प्यातच यशाने हिलकावणी दिली
या अपयशाने ती खचली नाही. दिवसरात्र एक करून 10 तास अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात यश पदरात पाडून घेतले
इशिताने यूपीएससी 2022 च्या परीक्षेत संपूर्ण देशात टॉप करत पहिला क्रमांक मिळवला.